वासांसि जीर्णानि यथा विहाय
नवानि गृह्णाति नरोऽपराणि।
तथा शरीराणि विहाय जीर्णा-
न्यन्यानि संयाति नवानि देही ॥
------------------------------------------
जगातल्या माणसांची "शरीरसंख्या" आज आहे ७,२७३.०००,०००हून जास्त;
दर सेकंदाला तिच्यात भर पडतेय् सरासरी २.३७ "मनुष्यशरीरांची."
जगातल्या मनुष्येतर "शरीरां"ची संख्या आज आहे १,०००,०००,०००,०००हून जास्त;
एकूण "शरीरां"ची संख्या तेव्हा मानू या आज आहे १,०१०,०००,०००,०००.
एक शरीर, एक आत्मा; म्हणजे जगात एकूण आत्मे १,०१०,०००,०००,०००.
पण मनुष्यशरीरे दर सेकंदाला वाढत आहेत सरासरी २.३७.
मनुष्येतर शरीरांची संख्या दर सेकंदाला नेमक्या २.३७ने होण्याची कमी
शक्यता खूप कमी आहे.
मग ज्यादा आत्मे येत आहेत पृथ्वीवर कुठून?