Author Topic: आठवणी कॅम्पसमधल्या  (Read 1359 times)

Offline shardul

  • Jr. Member
  • **
  • Posts: 186
आठवणी कॅम्पसमधल्या
« on: November 11, 2009, 02:51:07 PM »
My frnds poem

गणिताची समीकरणे सुटता सुटता शाळेचे वर्ष सरले

साहजिकच पाय इथल्या कॅम्पसमध्ये वळले

कॉलेज म्हणजे काय हे तेव्हा मला कळले.

वर्गातील मुले पाहून हृदर जोरात धडधडले

लेक्चर आहे का मीटिंग तेच नाही समजले

तेवढ्यात लक्ष माझे तिच्यावर स्थिरावले

कॅम्पसच्या विषाणूंनी या मनाला घेरले

लेक्चरला असतानाही मन कॅण्टीनमध्ये बसले

अभ्यासाचे ओझे मग गप्पांनी विरघळले

क्लासटीचरने आमचं रजिस्टर चेक केले

उपस्थिती पाहून माझी नाव माझे गाळले

मेडिकलचे सटिर्फिकेट तेव्हा धावून आले

हा हा म्हणता म्हणता कॉलेजचे वर्ष सरले

इतक्या गोड आठवणींचे फक्त तुकडेच उरले

मग आठवले, अरे तिला विचारायचेच राहिले

अहो सेण्डऑफ म्हणजे काय हे तेव्हा मला कळले.

- हेमंत दळवी, पेंढरकर कॉलेज, डोंबिवली


Marathi Kavita : मराठी कविता