Author Topic: भलेही दुनीयेच्या नजरेत आपल्यात काही खास नाय....  (Read 1043 times)

Offline Shraddha R. Chandangir

 • Jr. Member
 • **
 • Posts: 346
 • Gender: Female
भलेही दुनीयेच्या नजरेत आपल्यात काही खास नाय.
म्हणून कोणी वाट्टेल तसं बोलेल, इतका आपण third clas नाय.

जरी सलमान, शाहरूख, बच्चन सारखी आपल्यात काही गम्मत नाय
पण आपल्या item कडं कोणी बघेल, ईतकी कोणात हीम्मत नाय.

जरी मवाली अन गुंडा सारखा आपल्या वस्तीत आपला राज नाय
पण माय, बहीनींकडे वाईट नजर टाकू, ईतका आपल्यात माज नाय.

जरी Dr, Engg, वकील सारखी आपल्या कडे degree नाय
आपल्या कष्टांवर मी विश्वास ठेवतो, रस्त्यावरचा भिकारी नाय.

जरी राजनीती चे डावपेच खेळून या समाजाचे मी रक्षण करत नाय
एक साधासुधा माणूस मी,
कमीतकमी रक्षणाच्या नावाखाली भक्षण करत नाय.

- अनामिका

Marathi Kavita : मराठी कविता


Offline सतिश

 • Jr. Member
 • **
 • Posts: 127
 • Gender: Male


Offline सतिश

 • Jr. Member
 • **
 • Posts: 127
 • Gender: Male
होय.. मीही कविता लिहितो... व कविता वाचायलाही विशेष आवडतात..