Author Topic: माझे वजन  (Read 544 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
माझे वजन
« on: November 19, 2014, 09:39:49 AM »
येता जाता सर्व बोलाया लागले
कमी कर गड्या,वजन तुझे फार वाढले ! !

मित्र विचारतात वजन किती ? ?
बोलाव लागत खोट खोट
पण लपत नाही त्यांच्यापासून
जेंव्हा बघतात हे वाढलेले पोट ! !

बायको बोलती रोज मला
जेवण जरा कमी खाव
एकूण बायकोचे तेंव्हा
बाहेर मारतो वडा पाववर ताव ! !

करत जा थोडी dieting
जेंव्हा मित्र माझे मला बोलतात
त्या dieting मुळे रोज
थोडे जास्तच जाते पोटात ! !

भाउजी तुमचे किती पोट वाढले ?
जेंव्हा बोलते माझी मेंव्हनी
शरमेने होते माझ्या तेंव्हा
काळजाचे पाणी पाणी ! !

झोपतानी रोज निश्चय करतो
जाईन jogging ला सकाळी उठल्यावर
सकाळी जेंव्हा जाग येते
आजच ढकलतो उद्यावर ! !

संजय बनसोडे

Marathi Kavita : मराठी कविता

माझे वजन
« on: November 19, 2014, 09:39:49 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):