सये,
ग्रीष्माची आग बाहेर,
वणवा पेटवत असेल तेव्हा,
तुझ्या मनात मात्र, गुलमोहर फुलू दे,
तू ही जप त्या रखरखाठात
एक चंदन तुझ्या मनात
कोणालातरी शांतवण्यासाठी !
सये,
बाहेर मृगाचा पाऊस
तांडव करत असताना
तुझ्या मनात मात्र
श्रावणच झरू दे,
तुही जप त्या रुद्ररुपात
एक प्राजक्त तुझ्या
मनात दवबिंदुनि उमलणारा!
कारण सये,
बाहेर माघाची थंडी
'जगण' गोठवत असेल तेव्हा
कोणच्यातरी मनात शरदाचं
चांदणच बरसत असेल,
बाहेरच सत्य विसरून,
जपत असेल कोणीतरी,
सूर्याची कोवळी किरण,
तुझ्या स्वप्नांना फुलविण्यासाठी
फक्त तुझ्यासाठी ...
प्राजक्ता...