Author Topic: आता जरा काम करा महाराज  (Read 609 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
आता जरा काम करा महाराज
« on: November 20, 2014, 10:16:50 AM »
विदेश दौरे संपवा आता
भारत निर्माण घडवा आता 

शिक्षण, उद्योग, समर्थ भारत
तीन डोहाळे पूर्वा आता

भाषण ऐकून कान निवाले
भूक पोटाची पुरवा आता

स्तोम माजले धर्म पंथांचे
देशभक्तीही जगवा आता   

सीमा प्रश्नही फार पेटला
जनमत घेऊन विझवा आता 

गुर्हाळ चर्चा बरीच झाली
पाकिस्तान ते उडवा आता

ढोल नमोचे बडवून झाले
ढोल देशाचे बडवा आता
 
केदार...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline सतिश

  • Jr. Member
  • **
  • Posts: 127
  • Gender: Male
Re: आता जरा काम करा महाराज
« Reply #1 on: November 21, 2014, 06:36:23 PM »
कडक..!
फक्त पाकिस्तान उडवून जमणार नाही..!!