Author Topic: आहे कुणाचे ? ?  (Read 736 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
आहे कुणाचे ? ?
« on: November 21, 2014, 09:17:43 AM »
झाडावरच्या फांदीवरचे
मध चोरीले कुणी !
बाळाला काय द्यावे ?
परेशान मधराणी ! !

गोठ्यामधल्या गाईचे
दूध काढीले कुणी !
काय पाजेल वासरा
हंबरते ते भुकेनी ! !

डाल्या मधल्या कोंबडीचे
अंडे खाल्ले कुणी !
पिल्याला ती शोधते
उकीरडे हिंडुनी ! !

पंखासाठी सुंदर त्या
मोरा मारिले कुणी !
लांडोरी शोधे सवंगड्या
होऊन वेड्यावानी ! !

घनदाट होती जंगल
त्याला तोडिले कुणी !
जावे कुठे आता
हैराण झाले प्राणी ! !

संजय बनसोडे

Marathi Kavita : मराठी कविता


Ajay Ganekar

  • Guest
Re: आहे कुणाचे ? ?
« Reply #1 on: February 01, 2015, 12:35:15 PM »
Ekdam amstach.....