Author Topic: भटक्या कुत्र्यास  (Read 461 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
भटक्या कुत्र्यास
« on: November 23, 2014, 09:50:17 PM »
नाही नाव नाही गाव
नाही तुला राव रे !
टाकेल जो भाकर तुकडा
त्यालाच शेपटी हालवून दाव रे ! !

नाही गल्ली नाही बोळी
नाही तुला माय रे !
कुणी देत उष्ट टाकुनी
तेच तू खाय रे ! !

कुठेही खाती कुठेही झोपती
नाही मनी तुझ्या मळ रे !
हाड़! केल कुणी तुला
तेथून काढसी पळ रे ! !

ना भाकरी ना सिदोरी
ना जाती कुणाच्या घरात रे !
 प्रेमाने दिला तुकडा कुणी
पुन्हां येती त्याच्या दारात रे ! !

ना कुणी सोबती ना कुणी झोपती
येऊन तुझ्या खुशीत रे !
काटेच काटे आहेत तुझ्या
डोक्या खालच्या उशीत रे ! !

संजय बनसोडे

Marathi Kavita : मराठी कविता