———- मैत्री ———-
पुर्वाभिमुख उभे राहून….
वाट कसली पहाताय?
माझी ?…
तुमच्या मित्राची ?
हो ना ?…
तुमच्या मित्राचीच ना ?
अरे……तर मग, हात कसले उंचावताय…
या आणि घट्ट आलिंगन द्या मला…
मला ही जाणवू दे तुमच्यातल्या उर्जेची उब.
मी ही थोडा उजळेन म्हणतो….
लगेच….लगेच सरसावतील तुमच्यातलेच काही…
निश्क्रिय, शून्य तत्वाचे, नकारात्मक विचार सरणीचे,
बर्फाचे गोळे. आणि सांगतील तुम्हाला….
“याच्या जवळ येण्याने स्वतःचं अस्तित्व नष्ट करण्यचे खूळचट विचार कशाला करता ? ”
पण…तरिही,
मी तुम्हाला बोलावतोय माझ्या जवळ….
देतोय तुम्हाला आमंत्रण….
याचा अर्थ तुम्हीही तितकेच परिपक्व झाला आहात म्हणूनच ना ?
विज्ञानाच्या, बुद्धीमत्तेच्या आणि प्रयोगशीलतेच्या जोरावर….
उरात भरून घ्या…
पूर्ण श्वास आत्मविश्वासाचा…
आणि घ्या उत्तुंग भरारी….
एक दैदिप्यमान झेप !
भले सुरुवातीला तुमचे पंख जळतील,
नजरा दिपतील….
पण तावुन सुलाखून लख्ख सोनं होतील…..
तुमच्या महत्वाकांक्षा.
आणि मला ही मिळेल एक नविन पहाट…
आपल्या ‘मैत्री’ची
(unknown)