Author Topic: गाणे लिहितांना  (Read 941 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
गाणे लिहितांना
« on: December 08, 2014, 11:32:13 PM »
कुणी स्वत:साठी.
कुणी लोकांसाठी
कुणी पोटासाठी
कुणी स्वत:साठी.
कुणी लोकांसाठी
कुणी पोटासाठी
गाणे लिही ||१
परी लिहितांना
आनंद स्फुरणा
जागतसे मना
हेची सत्य ||२
पुढे काही होते
पुस्तक छापते
नावही मिळते
कुण्या एका ||३
कुणी नामवंत
कुणी कोपऱ्यात
कुणी वा रद्दीत
गप्प जाती ||४
इवल्या देशात
इवल्या भाषेत
इवल्या शब्दात
लाख कवी ||५
मिळो जया तया
हवी जी ती माया
मज देवराया
भेटे त्यात ||६

विक्रांत प्रभाकर

 
« Last Edit: December 10, 2014, 04:21:32 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: गाणे लिहितांना
« Reply #1 on: December 09, 2014, 09:56:18 AM »
vikrant, chan abhang aahe!!!! :)