Author Topic: जातीचा वाघ झाला  (Read 502 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
जातीचा वाघ झाला
« on: December 10, 2014, 03:23:32 PM »
भीमा तुझ्या लेकराला
आताच जाग आला !
पेटून उठला तो
जातीचा वाघ झाला ! !

परी तेज त्याचे भारी
सूर्याला लाजवेल !
अंधारल्या पिढीला
प्रकाश दाखवेल !
जरी तलवार एक धारी
तो दु धारी चालवेल !
केली समतेची पेरणी
भल्या भल्याना नमवेल !
भीमा तुझ्या पिल्याचा
पुन्हां उदय झाला !
पेटून उठला तो
जातीचा वाघ झाला ! !

तो पेटला रागाने
आकाश फाडायाला !
एका एका शब्दाने
त्याला  तोडायाला !
मौन केलेली तलवार
उपसुन  उठला तो !
जातीवादाला चिराया
खळबळुन पेटला तो !
मनुवादाच्या पीड़ान ग्रासून गेला होता
चीरन्यास आता त्याला
त्रासून उठला तो !
दुश्मनाच्या अन्यायाने
रक्तबंबाळ तो झाला !
पेटून उठला तो
जातीचा वाघ झाला ! !

संजय बनसोडे
 9819444028

Marathi Kavita : मराठी कविता