Author Topic: बाप माझा शेतकरी  (Read 2419 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
बाप माझा शेतकरी
« on: December 16, 2014, 04:07:45 PM »
रात दिस मेहनत करी
खाई कष्टाची भाकरी
पोचतो ही दुनिया सारी
बाप माझा शेतकरी ! !

त्याला साऱ्या दुनियाचा घोर
म्हणून खाई अर्धीच भाकर
जगा देतो तो पोटभर
ना त्याला सुख तीळभर
त्याच्याच कष्टाच खाती सारी
 बाप माझा शेतकरी ! !

त्याच्या मुळेच सार जग
ना दिसती त्याच कुणा दुःख
त्याचच खाऊन ; सर्वां सुख
त्याच्याच नशीबी आलय दुःख
रात दिस ढेकळात मरी
बाप माझा शेतकरी ! !

काळ्या मातीची त्याची खाणं
राबी त्याच्यात विसरून भान
घेऊन वाड वडिलाची आण
काढी त्यातून हिरव सोन
नसे त्याला कीमत जरी
बाप माझा शेतकरी ! !

संजय बनसोडे

Marathi Kavita : मराठी कविता

बाप माझा शेतकरी
« on: December 16, 2014, 04:07:45 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):