Author Topic: अनुभवाचे अत्तर  (Read 696 times)

Offline kasturidevrukhkar

  • Newbie
  • *
  • Posts: 22
अनुभवाचे अत्तर
« on: December 20, 2014, 12:28:32 AM »
जीवनाच्या  कुपीत  अनुभवाचे अत्तर असते
प्रत्येकाचा  सुगंध  निराळा असतो...
कंपनीचं  लेबल  मात्र  सेम  असतं.....

सृष्टीच्या या  मार्केट मध्ये  निर्मिती  होते त्याची
याची क्वालिटी  मात्र  असते  तुम्ही आम्ही  ठरवायची

जगाच्या या  बाजारात याचे  इम्पोर्टर  आहेत खुप
प्रत्येक  कुपीत  अत्तराचे  फ्लेवर्स  असतात  भरपूर

या  कुपीतील  अत्तराची  मोठी  आहे  गंमत
जेवढे  होते  जुने  वाढते  याची  रंगत.....

हरएक  कुपीतील  अत्तरात  असते  काहीतरी  खास
प्रसंगी  हेच  अत्तर  देते  पाठबळ  आणि  साथ........

या  अत्तरानेच   खुलतो  यशोमंदिराचा  परिसर
आयुष्यातील  चढ उतारात नाही  पडत  याचा  विसर.

       - सौ. कस्तुरी कुणाल देवरुखकर.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline सतिश

  • Jr. Member
  • **
  • Posts: 127
  • Gender: Male
Re: अनुभवाचे अत्तर
« Reply #1 on: January 01, 2015, 05:36:28 PM »
नेहमीप्रमाणेच ... अप्रतिम..!!