Author Topic: महावस्त्र  (Read 464 times)

Offline aap

  • Jr. Member
  • **
  • Posts: 94
महावस्त्र
« on: December 20, 2014, 02:13:25 PM »
महावस्त्र

काया हा जीवन रथ
आत्मारूपी स्वामी आरूढ त्यांत

इंद्रियांचे घोडे नका उधळू चॊफेर
मनाचा लगाम घाला त्यास

बुद्धीची चाके धावती सुसाट
विवेके दाविल सन्मार्गाची वाट

सुख दु:खाचे धागे घालितो वीण
जिद्दीचे बळ देई आनंदाचे क्षण

आयुष्य पॆठणी ही जरतार 
आत्मसमाधानाची लावा त्यास किनार

सकल  इंद्रियांचा जोड भार   
आयुष्य हे महावस्त्र जीवनाचे सार 
आयुष्य हे महावस्त्र जीवनाचे सार 
                             सौ . अनिता फणसळकर         

Marathi Kavita : मराठी कविता