Author Topic: अर्ध्य  (Read 408 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,257
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
अर्ध्य
« on: January 09, 2015, 11:11:35 AM »
अर्ध्य

आज पुन्हा एक
सुर्य डुंबताना पाहिला,
फिरून पुन्हा एक
दिवस संपताना पाहिला !

किती काळ असाच
सुर्य चक्राकार तो फिरला?
आयुष्य फिरता फिरता
आता जीव पण अंधारला !

दिले घेतले तुजशी
काही न उरले हाताला,
ओंजळ रीती माझी
कसे दयावे अर्ध्य तुला?

©शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता