Author Topic: ऊन कोवळे  (Read 552 times)

Offline SONALI PATIL

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
ऊन कोवळे
« on: January 09, 2015, 04:57:02 PM »
नेहमीच ऊन कोवळे
असेच नाही राहायचे

कधी तप्त कधी ढगाळ
असेच दिवस यायचे...

मी न मोजल्या कधी
छटा ईद्रंधनुच्या

जगत राहीले, कधी धुक्यात
कधी ऊनात या..

दिवसा मागुनी दिवस
असेच रोज यायचे

रोज दिवसातूनी क्षण
सोनेरी वेचायचे..

हसता हसता रडायचे
कधी रडतानाही हसायचे

कोवळया ऊनात कधी
क्षण हसरे फूलवायचे ...

सळसळना-या झ-यात या
हळूच दुखः सोडायचे

येताना माञ
ओझंळीत सुख भरभरूण आणायचे..

sonali patil

Marathi Kavita : मराठी कविता