Author Topic: ==तू==  (Read 1111 times)

Offline सूर्य

  • Jr. Member
  • **
  • Posts: 59
  • Gender: Male
==तू==
« on: November 18, 2009, 12:47:03 PM »

तू मनाची प्रेरना
तू मनाची वेदना
भावना मनाची तू
तू मनाची संवेदना

ओठ बालगोट तू
सारा सार विचार तू
तू अंतरातील कामना
कल्पवृक्ष आचार तू

तू सूक्त श्रुंगारिका
तू मुक्त सुवासिनी
शब्दरूप गझल तू
तू मन वृत्त कामिनी

लक्तरी प्रकाश तू
स्वप्न भंग याद तू
तू मनाची घाळ मेळ
एक माझी फ़रियाद तू


सूर्य

Marathi Kavita : मराठी कविता