Author Topic: देव शोधण्या मंदिरात गेलो  (Read 625 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
देव शोधण्या मंदिरात गेलो
दगडालाच देव समजून बसलो

जे होत माझ्या मनात
सांगितल त्याच्या कानात


पंडित म्हणाला ऐक बेटा
देवा समोर ठेव दोन नोटा

जर नाही देणार दक्षिणा
पूर्ण नाही होणार मनोकामना

दोन नोटा दिल्या त्याच्या हातात
पंडित हळूच हसला गालात
बोलला देवाला मनात

असेच येऊदे रोज भामटें
तेंव्हाच भरतील पोटे आमचे

संजय बनसोडे