Author Topic: भरलेला हंडा रिता कसा झाला  (Read 425 times)

Offline Shivshankar patil

  • Newbie
  • *
  • Posts: 22
भरलेला हंडा रिता कसा झाला
पाण्याचा घोट तर आम्हा नाही मिळाला
सत्ते मध्ये आमचा सहभाग कधी झाला
ठाव नाही मला, त्याची चव काय ते
           
            थाटलेली दूकान हे कोणासाठी गड्या
            भरलेला हंडा रिता कसा झाला
            पाण्याचा घोट तर आम्हा नाही मिळाला

खैरात ही सवलतीची करती बोळवण
दावती स्वप्ने हे सत्तेच्या गाजराची
मतलबाकरीता हात जोडून विनवणी
संपता मतलब दावती खेटर
         
           भरलेला हंडा रिता कसा झाला
           पाण्याचा घोट तर आम्हा नाही मिळाला ।


शिवशंकर पाटील
वरिष्ट तुरूंगाधिकारी
९४२१०५५६६७