Author Topic: कधी येशील तू ., सांग ना ??  (Read 699 times)

Offline AKSHAY BHALGAT

  • Newbie
  • *
  • Posts: 18
कधी येशील तू ., सांग ना ??
« on: January 21, 2015, 09:29:29 AM »
कधी येशील तू ., सांग ना ??
तू कुक्कुल्ल बाळ माझं ., दिसशील कोणासारख ?
मन मिळाऊ असशील ., कि शांत पप्पा सारख ...
शब्द बोलण्याआधी एकदा ., " आई " म्हणशील ना …
कधी येशील तू  ., सांग ना ??

चाहूल तुझ्या येण्याने ., मनी फुललाय पिसारा .,
तुझ स्वागत करण्या ., मोहल्ला जमा झालाय सारा .,
कान अतुरलेत आमचे ., तुझे रडणे ऐकण्या .,
कधी येशील तू  ., सांग ना ??

उंच उंच आभाळी ., तुज झोका मी देईन .,
अलगद उचलुनी तुजला ., कवेत मी घेईन .,
आतुरलेत डोही माझे ., तुझे रूप भरण्या .,
कधी येशील तू  ., सांग ना ??

कसा सावरेल मी संसार ., अन कशी पेटवेल चूल ;
एकीकडे माझे सर्वस्व ., एकीकडे मुल .,
झालीच धावपळ थोडी ., पण तू समजून घे ना .,
कधी येशील तू  ., सांग ना ??


मनात घालमेल प्रश्नांची ., अन काळजी तुझ्या भविष्याची .,
अजूनही स्वप्नातच असल्या सारख ., ती जाणिव तुझ्या स्पर्शाची .,
या चारबाहू सज्ज आहेत ., कवेत तुला घेण्या  .,
कधी येशील तू  ., सांग ना ??

कधी येशील तू  ., सांग ना ??

अक्षय भळगट
२१.०१.२०१५

Marathi Kavita : मराठी कविता


फुलराणी

  • Guest
Re: कधी येशील तू ., सांग ना ??
« Reply #1 on: January 28, 2015, 12:09:22 AM »
"कधी येशील तू , सांग ना ??"
पुसलेस तू, आई
सहा संपले मास, आई
उरले महिने तीन