Author Topic: काहूर भावनांचे...  (Read 732 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

  • Jr. Member
  • **
  • Posts: 229
  • Gender: Male
  • कवी प्रकाश साळवी
काहूर भावनांचे...
« on: January 21, 2015, 09:22:44 PM »
    काहूर भावनांचे...
काहूर भावनांचे अपसुक का ऊठावे?
मी आसवांना अलगद कोळून प्यावे
गोंजारू किती मी दूःखात आसवांना
ऊगा भावनांनी का जुळवुन घ्यावे?
अरे भावनांचा ओघ हा कसा आवरावा ?
जणू कमळ भावनांचे जरी ऊमलून यावे
हलकेच भावनांची पण बरसात होते
धुंदीत आसवांच्या कळ्यांनी बहरून यावे
मृदूल भावनांनी मी कसा घायाळ होतो
मग आसवांनी पून्हा का ऊन्मळून जावे ?
नाते कसे हे विचित्र भावना-आसवांचे
भावना तिथेच आसवांनी ओघळून यावे
जश्या भावना आसवेही तश्याच असती
नाते अश्रू भावनांचे का जूळून यावे?
श्री.प्रकाश साळवी २१-०१-२०१४.   

Marathi Kavita : मराठी कविता