Author Topic: देशासाठी जाग येते  (Read 557 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
देशासाठी जाग येते
« on: January 24, 2015, 03:46:47 PM »
देशासाठी जाग येते आम्हां
15 ऑगस्ट अन् 26 जानेवारीला
मंग अंगात रक्त सळसळतं
अन् निघतो देशाच्या वारीला ! !


एरवी आम्हां देश प्रेम
वाटते एक भनंभनं
स्वातंत्र्य दिनाच्या दिवसी
होते तिरंगाची आठवण !
मग सुटतो आमचा धीर
डोळ्यासमोर येतात शूर वीर
शहारते सारे अंग
अंगी अवतरतो भगत सिंग !
पुन्हां टवटवीत करतो
देशप्रेमाच्या धारीला !
मंग अंगात रक्त सळसळतं
अन् निघतो देशाच्या वारीला ! !


जाग येते इंटरनेटला
आदळतात त्याच्यावर रंग तिरंगी
बघून इंटरनेटचे यूज़र्स
आनंदी होतात फिरंगी !
मोबाईलवर sms चा
चढ़तो झेंड्यावर झेंडा
" भारत माता की जय " म्हणतो
न बोलणारा गेंडा !
रोज विदेशी कपडे घालणारी
पून्हा आवडते साड़ी नारीला !
मंग अंगात रक्त सळसळतं
अन् निघतो देशाच्या वारीला ! !

संजय बनसोडे

Marathi Kavita : मराठी कविता

देशासाठी जाग येते
« on: January 24, 2015, 03:46:47 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
Re: देशासाठी जाग येते
« Reply #1 on: January 28, 2015, 01:09:45 PM »
खूप छान ..

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):