Author Topic: विधीलिखीत  (Read 750 times)

Offline गणेश म. तायडे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 195
  • Gender: Male
  • ॥लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी॥
    • ganesh.tayade
विधीलिखीत
« on: January 24, 2015, 03:54:26 PM »
विधीलिखीत काय आहे,
माहीत ना कुणाला...
रंगणार स्वप्न केव्हा,
माहित ना कुणाला...
जिवनाचे काय कोडे,
उलगडे ना कुणाला...
वायुची काय रचना,
दिसली ना कुणाला...
प्रेमाची काय भाषा,
कळली ना कुणाला...
आसमंताची काय सिमा,
मोजता ना येई कुणाला...
मरणाची काय भिती,
जगणे ना कुणाला...
जिवन गणित अकलनिय,
कळले ना कुणाला...
अकलनिय सारे आहे,
कळणार ना कुणाला...
विधीलिखीत काय आहे,
माहीत ना कुणाला...

- गणेश म. तायडे
   खामगांव
  ganesh.tayade1111@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता


Bhaskar Baburao Chemate

  • Guest
Re: विधीलिखीत
« Reply #1 on: February 07, 2016, 06:23:15 AM »
मराठी  कविता पाठवा.