स्मितगुढ
ती: सांगु कशी मी?
गुज मज मनीचे,
उमगते का तुजला
स्वप्न तुझ्या मनाचे?
तो: स्मितगुढ हास्य तुझे
मज भासे मोनालिसाचे,
कळले मला हलकेच
स्पंदन नाजूक पावलांचे !
ती: येईल वास्तवात स्वप्न
फलित गोंडस भावनेचे !
ती: येशिल त्वरी परतुनी
घ्यावया अनुभव सुखाचे !
© शिवाजी सांगळे