Author Topic: इथे वेदना मना रोज छळतेच आहे  (Read 586 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 166
इथे वेदना मना रोज छळतेच आहे
जीवन काय आहे हे कळतेच आहे

इथे प्रेमाला त्या द्वेषाचे उत्तर आहे
इथे प्रवास जीवनाचा खडतर आहे

इथे भावनेची कदर कुणा ती नाही
वेदना मनिचि मनाशीच राही

इथे रोज होतो लिलाव तो नात्याचा
बदलतो रक्तगट इथे रोज रक्ताचा

दुःखाचा तो दाह इथे वाढतच जाई
सुखाची झुळूक मात्र दुरुनच जाई

मरावे रोज इथे मरुनि जगावे
"सुंदर आहे जीवन हे" मनाशीच म्हणावे!

---राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com