Author Topic: खडूस तुझा बापूस  (Read 500 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
खडूस तुझा बापूस
« on: February 12, 2015, 08:56:21 AM »
तुझ्या केसावरचा गजरा
हलवीत हलूच तू लाजते
बघून तुझा चेहरा
मन माझ फुलते
तेंव्हा . . .
मेला खडूस तुझा बापूस
माझ्यावरच डोले वासते ! !

आवरा काय गर्व
तुझ्या बापूसला झाला
देईन इस्टेट मी सर्व
जाऊन सांग त्याला
तू जवली आल्यावर आपोआप
मनात माझ्या सनई वाजते !
तेंव्हा . . .
मेला खडूस तुझा बापूस
माझ्यावरच  डोले वासते !!

तुझ्या आयवानी देखणी तू
दिसते पापलेटवानी चिकनी तू
रातभर तलमलवते मना
येतेस रोज माझ्या सपनी तू
गुबगुबीत गाल तुझे
देवगडचा हापूस मज भासते
तेंव्हा . . .
 मेला खडूस तुझा बापूस
माझ्यावरच  डोले वासते !!

खेकऱ्यावानी फावरा
बाप तुझा बेवरा
येउन माझ्या बापूसला
बोलतो तुझ्या पोराला आवरा
येता जाता मला आता
माझा दादुस पण हासते !
जेंव्हा . . .
मेला खडूस तुझा बापूस
माझ्यावरच डोले वासते !!

संजय बनसोडे

Marathi Kavita : मराठी कविता