Author Topic: ऋतुराजा  (Read 530 times)

ऋतुराजा
« on: February 16, 2015, 12:18:22 PM »
मेघ भरले आभाळ
ओली सर भुईवर
भिजलेला मृदागंध
होइ वरयावरती स्वार
   
हवा कुंद नि दमट
ओली निसरडी वाट
शुभ्र धुक्यात हरवले
डोंगरमाथ्याचे घुमट

स्वच्छ नितळ पाण्याचे
वाहते झाले पाट
काळ्या आसमंती
होइ विजांचा गडगडाट

आला पाऊस भिजत
ऋतुराजाच्या थाटात
अंकुरते बीज
भुमातेच्या पोटातMarathi Kavita : मराठी कविता