Author Topic: संध्याशरु  (Read 474 times)

Offline varsh

  • Newbie
  • *
  • Posts: 3
संध्याशरु
« on: February 20, 2015, 10:21:55 PM »
सूर्यास्त
उधळण मुक्त
रंगांची सप्त
उरतात फक्त
संध्याश्रू...

सूर्यास्त
पश्चिमेस जेव्हा
न कळे मज केव्हा
भेटतात तेव्हा
संध्याश्रू...

सूर्यास्त
ओझरता प्रकाश
दरवळता सुवास
छळतात जीवास
संध्याश्रू...

सूर्यास्त
थकलेली घरटी
निवलेली दिवटी
सलतात शेवटी
संध्याश्रू...

सूर्यास्त
परतीच्या  वारीत
थिजलेल काळीज
तुझी-माझी बेरीज
संध्याश्रू...!!!

~वर्षा
http://varshanarkhede.weebly.com

Marathi Kavita : मराठी कविता