Author Topic: लिहिले ते सारे  (Read 620 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
लिहिले ते सारे
« on: February 22, 2015, 06:21:32 PM »

लिहिले ते सारे जुने
नवे आता काही नाही .
लिहिणारा लिहतसे
पण तोच आता नाही

सांभाळून घेतलेसे
धन्यवाद म्हणतसे
तुमचेच होते सारे
नाव खाली लिहतसे

पुन्हा काही फुटतील
नवनवे धुमारेही
अन फळ फुलांसाठी
खग गण येतीलही

माझे होते उगा काही
कोमेजून जाईलही
जीवनाचे हुंकार ते
अरे बाकी काही नाही

विक्रांत प्रभाकर
 
« Last Edit: February 26, 2015, 01:16:11 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता