Author Topic: थंड झाला लढ्याचा पूर  (Read 348 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
थंड झाला लढ्याचा पूर
« on: February 26, 2015, 12:02:10 PM »
पुरोगामी विचारवंताच्या मारेकऱ्या विरुध्द लढ्याचा पूर
आता शांत झाला
हळूहळू ओसरत आता त्याचा अंत झाला
इंटरनेटवर वाहणारे सोसाट्याचे वारे हळूहळू मंदावले
मोठ मोठी झाडे गचाट्यात घेऊन वाहणारे तूफान
जागीच थंडावले
रक्तात सळसळणाऱ्या ज्वालामुखीच्या लाव्हा
शांत होताना दिसल्या
हळू हळू ओसरत दगड होउन बसल्या
समोर जे येइल त्याला आपल्या पोटात घेऊन
स्वतः रस्ता तयार करून वाहणारा पूर
धरणात जाऊन शांत झाला, आता तो शूर
स्वतःच्या तेजाने व आक्रोशाने हरएक वस्तूला
जागच्या जागीच जाळणारा विजेचा कडकडाट
आकाशात एका कोपऱ्यात शांत होताना दिसला
रुद्र अवतार घेऊन थय थय तांडव करणारा तो ढग
निळ्या शुभ्र आकाशी नाहीसा होउन बसला
सर्वच आता आपआपल्या ठिकाणी शांत झाले
आता सर्वच आपआपल्या घरात वाट बघत बसले

पुन्हा एका दाभोळकराच्या खुनाची
पुन्हा एका पानसरेच्या खुनाची
कारण त्याना त्याच तेजाने, आक्रोशाने संधी मिळेल
पुन्हा गरजायला, पुन्हां वाहायला
पुन्हा पडायला, पुन्हा जाळायला


संजय बनसोडे

Marathi Kavita : मराठी कविता