Author Topic: होळी आनंदाची ?  (Read 439 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
होळी आनंदाची ?
« on: March 06, 2015, 03:09:45 AM »
आनंदाची खरी होळी
फक्त आठवणीत राहीली
आधुनिकतेला सोबत घेऊन
आमची संस्कृती विसरली

लहानपणीचा तो आनंद
मनसोक्त खेळण्याचा
आज उरला फक्त
सण शुभेच्छापुरता

खेळण्यातला रंग आता
जीवनात नाही उरला
रोजच्या जगण्यात आता
आनंदही नाही उरला

फक्त आठवणीच उरल्या
सणा-वाराच्या
अंदाज मनात बांधतोय
पून्हा रंग खेळण्याचा
-----------------
प्रविण रघुनाथ काळे
मो. :- 8308793007
दि. 5 मार्च 2015

Marathi Kavita : मराठी कविता