Author Topic: धुईमाती  (Read 363 times)

Offline गणेश म. तायडे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 195
  • Gender: Male
  • ॥लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी॥
    • ganesh.tayade
धुईमाती
« on: March 06, 2015, 10:27:46 AM »
शिमग्याचा सण आला
धुईमातीला रंग आला...
लहान मोठ्यांच्या चेहऱ्यावर
रंगांचा थर आला...
जिकडे-तिकडे रंग उधळले
आनंदाचा सण आला...
गरम भज्यांच्या तळणासोबत
रंगाना स्वाद आला...
लाल काळा पिवळा हिरवा
सर्वांना एकच रंग आला...
न्हाऊनी गेल्या रंगांमध्ये
गवळणींचा सण आला...
दुर झाले रूसवे-फुगवे
मैत्रीचा सण आला...
रंगात होऊनी दंग
रंगबिरंगी सण आला...
शिमग्याचा सण आला
धुईमातीला रंग आला...

- गणेश म. तायडे
    खामगांव
  ganesh.tayade1111@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता