Author Topic: असा एक कवी असावा..  (Read 505 times)

Offline Aishu

  • Newbie
  • *
  • Posts: 32
असा एक कवी असावा..
« on: March 12, 2015, 08:33:35 AM »
#*असा एक कवी असावा *#

असा एक कवी असावा....
कुठेतरी तो माझ्यासाठी वसलेला असावा पण,
ओळख त्याची माझी फारशी नसावी
माझी कवीता अनं मी त्याच्या ह्रृदयी वसलेली असावी
कवितेतुनच त्याला माझ्या सु:ख दु:खांची जाणीव व्हावी.....


असा एक कवी असावा....
माझ्या कवितेतल्या प्रश्नाच उत्तर त्याने कवितेतच लिहावं
माझ्या दु:खाच्या कवितेच उत्तर त्याने सु:खाच्या कवितेतुन द्यावं
न पाहता देखील माझ्या सौंदर्याचं वर्णन त्याने त्याच्या कवितेतुन मांडावं
अनं कविते कवितेतुनच त्याने माझ्या प्रेमात पडावं.....

असा एक कवी असावा..
असा एक कवी असावा..
®ऐश्वर्या सोनवणे..
मुंबई...
दि:-12-3-15
वेळ:-8:00am... 
(कवितेखालीली नाव न काढता कविता पुढे पाठवावी.कविता कॉपी ही करु नये)

Marathi Kavita : मराठी कविता