Author Topic: बाबा नि आई  (Read 892 times)

Offline Vedanti

  • Newbie
  • *
  • Posts: 34
  • Gender: Female
बाबा नि आई
« on: March 14, 2015, 10:46:40 PM »
लहानपणी नव्हती ओळख अस्तित्वाची आपणास,
हरवून गेलो होतो खेळ नि खेळणींच्या नादात...

तेव्हा तर स्वतःची ओळखही स्वतः करता येत नव्हती...
ओळख करून देणार असे कुणी नाही बाबा नि आईच होती...

त्यांनी आपल्यासाठी केलेली कार्ये ती जगावेगळीच...
फेडता फिटणार नाही ऋण त्यांचे कुठलेही कधीच...

प्रेमाला त्यांच्या समजुन घ्यायला हवे,
त्यांनीच तर दिले होते आपणास तत्त्व नवे...

जबाबदारी आल्यावर त्यांची का बरेचजण तोंड फिरवतात?
आदर सत्कार तर सोडा, नीट बोलणच विसरतात....

आहात कृतज्ञ त्यांच्याबद्दल तर आहे बरे...
त्यांची आपल्याकडून एवढीच अपेक्षा असते हे खरे...

आपल्या आनंदातच तर आनंद लपलेला असतो त्यांचा...
म्हणूनच प्रत्येकाला असावा अभिमान आपल्या आई-वडिलांचा...
                                                                                         

वेदांती आगळे
 
« Last Edit: April 20, 2015, 10:48:14 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline mayur47

  • Newbie
  • *
  • Posts: 9
Re: बाबा नि आई
« Reply #1 on: June 14, 2015, 12:51:59 AM »
अभिमान आपल्या आई-वडिलांचा