Author Topic: आता घे दुवा...  (Read 397 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,257
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
आता घे दुवा...
« on: March 15, 2015, 05:00:55 PM »
आता घे दुवा...

का रं पावसा असा
कहर अवेळी मांडला?
शेतकरी राजा माजा
पार ओरबाडूनी गेला !

ग्याल सारं पिकपाणी
स्वप्न पण विखुरली,
घामाची, कष्टाची त्याज्या
झोळी पण रीती झाली !

नको रं असा कोसळु
ठेव जाणिव लेकरांची,
ऐकलसा खुप शिव्याशाप
आता घे दुवा तरी त्यांची !

झाल गेलं तो विसरतो
जुपल पुन्हा तो कामाला,
दिवु नकोस रं तू दगा
अजाबात पुढल्या वक्ताला !

अजाबात पुढल्या वक्ताला !
 
© शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता