Author Topic: जिवाशिवाची भेट एकदा घडेल का रे?  (Read 410 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
जिवाशिवाची भेट एकदा घडेल का रे?
ह्रिदय मंदिरी मूर्त शिवाची वसेल का रे?

भवसागर हा तरून जाण्या पूल हवा पण
श्रध्धे वाचुन वीट सागरी तरेल का रे? 

हिरव्या भगव्या जरी पताका इथे मिरवल्या
रक्तवर्ण तो सांग वेगळा असेल का रे?

धर्म वाढतो संस्कारांनी, बाल मनानी
गोळ्या मारून धर्म कोणता जगेल का रे?

लेकच घेतो वीट मारून प्राण पित्याचा
उभा विटेवर तरी सावळा असेल का रे?
 

केदार...