Author Topic: आई तू कुठे आहेस ग  (Read 550 times)

Offline Gajendra Valvi

  • Newbie
  • *
  • Posts: 9
आई तू कुठे आहेस ग
« on: April 07, 2015, 10:39:04 PM »
शोधत आहे मी तुला
आई तू कुठे आहेस ग

कड़क उन्हाच्याच्या दुपारी
गार वारा हळूच स्पर्श करी
भास झाला मला तुझा अंतरी
सांग ना
आई तू कुठे आहेस ग

खोड़कर माझे ते वागणे
रागाने तुझे ते मला मारणे
आठवी मला ते सगळे
सांग ना
आई तू कुठे आहेस ग

मार तुझा मिळाल्यावर रडी मी हुंदके देउनि
माया तुझी पूर्ण होइ मला जवळ घेऊनी
सांग ना
आई कुठे आहेस ग

हट्ट सगळे माझे तूच पूर्ण करी
बाबांच्या मारा पासून तूच वाचवी
किती निस्वार्थी प्रेम तू करी
 सांग ना
आई तू कुठे आहेस ग

शोधून मी थकलो आता
काहीसा हरून गेलो आता
समजले माझेच मला
तू तर आहेस माझ्याच अंतरी

तरीही सांग ना
आई तू कुठे आहेस ग

गजेंद्र वळवि

Marathi Kavita : मराठी कविता