Author Topic: नसतं तेच नाते  (Read 682 times)

Offline Rashmi Vinod Pawar

  • Newbie
  • *
  • Posts: 3
नसतं तेच नाते
« on: April 14, 2015, 10:26:30 PM »
नसतं तेच नातं


नसतं तेच नाते
त्याच्याच जवळ जावसं वाटे 
सख्या सोयरयांचा सहवस नकोसा वाटे

नसतं तेच नाते
आठवण येताच लगेच रडू येते
हृदय अगदी भरभररून जाते
           
नसतं तेच नाते 
हाक मारण्याआधीच धाऊन येते
दिखाव्याचे सोंग करणं जमतच नसते

नसतं तेच नाते
विश्वासाने मन प्रसन्न राहते
हृदयाच्या यादीत त्याचं नाव आपोआपच प्रथम येते                        रश्मी......
 
« Last Edit: April 14, 2015, 10:31:35 PM by rashp2012 »

Marathi Kavita : मराठी कविता