Author Topic: स्त्रीचं सौंदर्य  (Read 675 times)

Offline Rashmi Vinod Pawar

 • Newbie
 • *
 • Posts: 3
स्त्रीचं सौंदर्य
« on: April 16, 2015, 10:33:08 PM »
स्त्रीचं सौंदर्य  


स्त्रीचं सौंदर्य ते,
नाही वस्त्र ती शरिरावर चढवी त्यात ,
किंव्हा ती किती छान दिसते त्यात

स्त्रीचं सौंदर्य ते,
बघा तिच्या डोळ्यात ,
जी वाट तिच्या हृदयात

स्त्रीचं सौंदर्य ते,
नाही तिच्या चेहऱ्यात ,
तर आहे तिच्या आत्म्याच्या प्रतिबिंबात

स्त्रीचं सौंदर्य ते,
दिसतं तिच्या काळजी करणाऱ्या स्वभावात ,
 ओढ जी ती दाखवते त्यात

स्त्रीचं सौंदर्य ते
तिच्या शांत प्रसन्न चित्तात ,
तिच्या आवडीच्या क्षेत्रात ऊंच भरारी मारण्यात

                                             रश्मी ……

रश्मी विनोद पवार
पुणे
१५.-०४-२०१५
                                             

Marathi Kavita : मराठी कविता


Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Re: स्त्रीचं सौंदर्य
« Reply #1 on: April 16, 2015, 11:05:48 PM »
 सुंदर