Author Topic: मेघराजा  (Read 309 times)

Offline Dipak Pawar

  • Newbie
  • *
  • Posts: 1
मेघराजा
« on: April 17, 2015, 11:21:58 AM »
         मेघराजा

आले आज आभाळ भरून
वाट पाहिली मेघराजा तुझी किती
भेट तुझी होईल धरणी मातेशी
सुखाचे अश्रू येतील भरुनी

नाते मेघराजा तुझे नी माझे जुने
लपंडाव किती खेळला तरी
भेगाडलेल्या जमिनीचा तूच वाली
सरी तुझ्या येता सुगंध मातीचा हि होई

हिरवी चादर आज पसरली कशी
गोकुळी श्रीकृष्ण नांदावा तशी
ओढ्यांचा हि आवाज खळखळ होई
कपाळी आठी आज सैल झाली.

दिपक पवार

Marathi Kavita : मराठी कविता