Author Topic: बोली  (Read 371 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
बोली
« on: April 29, 2015, 10:43:16 AM »
पिकवले दाणे ज्यांनी,तेच मोहताज झाले भाकरीला
चंद्र मोकळा ढाकळा,अन् शोभा चांदण्याची धरणीला !

पिकवतो एक घामाने,बोली लावतो तिसराच कुणी
झाले धनिक आज ते, जे आहेत आडतीत चाकरीला !

भरुन ठेवल्या घर्मघागरी,मोजणी कराया कष्टाची
फुटके नशिब अन् होतेच बुड कुठे त्या घागरीला ?

अपाराम सपाराम लिहीलेले आमच्याच कसे भाळी ?
मस्तवाल वळूंनो, जुंपून घ्या एकदा स्वतः काकरीला !

बुडविला सूर्य ज्यांनी अंधारतळी, कृष्णकृत्ये झाकण्या
कायदा ही बघ ना गड्या, त्यांच्याच बांधलेला दावणीला !

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता