Author Topic: शापित  (Read 368 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,258
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
शापित
« on: May 03, 2015, 03:17:07 PM »
शापित...

बनवुन शब्द कुंचल्याचा
कधी शब्दांचाच कुंचला,
शोध मानस अंतरगांचा
उत्तर मनानेच मनाला !

सल एक अपुर्णतेचा
नित्य उरात दडलेला,
शोध सुक्ष्म पुर्णतेचा
जीवा ध्यास जडलेला !

शापित गंधर्व स्वर्गीचा
पृथ्वीवर का उतरला?
घेवुनी अश्वथ्थ शल्य
कलावंतची तो जन्मला !

© शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता