Author Topic: माझी सावली  (Read 602 times)

Offline Ravi kamble

  • Jr. Member
  • **
  • Posts: 106
माझी सावली
« on: May 06, 2015, 07:25:27 PM »
*  माझी सावली *
एकटाच उभा स्तब्ध
पक्षी ही फिरकला नाही
सावलीला ही माझ्या
सावलीच उरली नाही

ओसाड झाले जग
खेळ संपला भावला भावलीचा
आधार फक्त राहिला
मला माझ्या सावलीचा

या खुल्या आसमंती
ना कोणी माझ्या सोबती
सोडुन गेले साथी
आता सावलीच माझा सारथी

सुन्न झाले आभाळ
ओसाड पडली जागा
एकटाच उरलो मी
विस्कटला आयुष्याचा धागा

Marathi Kavita : मराठी कविता