Author Topic: निर्लज्जांचा संग नको देऊ देवा  (Read 368 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 166
निर्लज्जांचा संग नको देऊ देवा
भले तरी एकटे ठेव मला...1

नको मुर्खांशी ती गाठ कधी माझी
त्यापरी पशुची साथ बरी...2

विश्वासघातकी अन बेईमान
सावली ही नको त्यांची मज...3

ज्या इसमापासी माणुसकी नाही
त्यांचे दर्शनही  घड़ो नये...4

कितीक जन्मती मानवाच्या नावे
पशुतरी त्यांच्या पेक्षा बरी...5
---राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com