Author Topic: काय दोष  (Read 397 times)

Offline Ravi kamble

  • Jr. Member
  • **
  • Posts: 106
काय दोष
« on: May 07, 2015, 11:36:54 PM »
* काय दोष माझा *

काय दोष माझा
मी नपुंसक जन्मा आलो
काय दोष जन्मदात्यांचा
मी नपुंसक जन्मा आलो

मी ही खेळलो बागडलो
माझ्या लहान पणी
मी ही शिकलो सावरलो
सह माझ्या मित्र मैत्रिणी

मग दोष काय माझा
मी नपुंसक जन्मा आलो
काय दोष जन्मदात्यांचा
मी नपुंसक जन्मा आलो

तारुण्यात मी आलो
निसर्गाने केला घात
मलाच नाही कळल
का शरीर देत नाही साथ

मग दोष काय माझा
मी नपुंसक जन्मा आलो
काय दोष जन्मदात्यांचा
मी नपुंसक जन्मा आलो

विनाशक रुढीच्या जाळ्यात
देवाचा म्हणून वाहिलो मी
पुरुष जात जन्मा येऊन
देवदाशी बनुन राहिलो मी

पण दोष काय माझा
मी नपुंसक जन्मा आलो
काय दोष जन्मदात्यांचा
मी नपुंसक जन्मा आलो

(रविंद्र कांबळे पुणे 9970291212)

Marathi Kavita : मराठी कविता