Author Topic: देवा  (Read 420 times)

Offline Ravi kamble

  • Jr. Member
  • **
  • Posts: 106
देवा
« on: May 17, 2015, 10:36:58 AM »
* देवा,...*

सांगत नाही कोणी मला
देवा तुझा अत्ता पत्ता
विचारायचं आहे तुला
कुठे गेली तुझी सत्ता

कुठला पक्ष आला होता
का आता सारखी होती लाट
दिसेना कुठला देव जिवंत
का झालास तु भुईसपाट

लहान पणा पासुन बघतोय नाटक
तुला आहेत म्हणे चार चार हात
आला नाहीस कधी रोखायला
रोज मरते अत्याचारान दलित जात

जर आहे तुझा खरा महिमा
मग दाखव आम्हा चमत्कार
एक तरी वाचवुन दाखव
रोज होणारे बलात्कार

पैसे घेतल्यावरच म्हणे
तु भक्ताला पावशी
पण कधीच दिसला नाय का तुला
शेतकरी घेताना फाशी

रोज मरती कित्येक बाळ
दुधा वीना उपाशी
तुझा चांगला चाललाय अभिषेक
नी खातोस रोज तुपाशी

(रविंद्र कांबळे पुणे 9970291212)

Marathi Kavita : मराठी कविता