Author Topic: माझ्या मनामनात गुंजते कविता  (Read 356 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 167
माझ्या मनामनात गुंजते कविता

प्रसवली वेदना जन्मली कविता
सुखाश्रुं नयनी अवतरली कविता
संताप मनीचा सांडते कविता
सुख-दुःख सारे मांडते कविता

मनिचा उद्वेग उधृती कविता
जनीचा कल्लोळ सांगती कविता
अन्यायाला वाचा फोड़ते कविता
असत्याचा पिच्छा पुरवते कविता

प्रेमाचा प्रवाह वाहवते कविता
विरहाच्या एकांति झुरवते कविता
हास्याचे फवारे उडविते कविता
स्वप्नीच्या हिंदोळी झुलविते कविता

कविच्या हृदयीं विराजते कविता
वाचकांच्या ओठी शोभते कविता
इतकी खोलवर रुजली कविता
माझ्या मनामनात गुंजते कविता
--- राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com