Author Topic: तुमच्यामुळेच...  (Read 330 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
तुमच्यामुळेच...
« on: May 23, 2015, 01:43:38 PM »
बाबा फक्त तुमच्यामुळे,
झाले हे गुलाम मोकळे,
जातीभेदातल्या या दरीतुन,
पुन्हा आनंदाने फिरू लागली ही पाखरे ,
जन्मोजन्मीच्या अन्यायातुन
मुक्ती मिळुन जगू लागली ही माणसे,
बाबा फक्त तुमच्यामुळे,
तुमच्या त्यागामुळे
आम्हाला माणूसपण मिळालं,
तुमच्या त्या अपार कष्टातून,
आम्हाला कायद्याच रक्षण मिळाल,
बाबा तुमच्यामुळेच
या लाखो बहुजनांना न्यायाच मोल कळाल तुमच्यामुळेच.
या देशातल्या 100 कोटी लोकांना समतेच संविधान मिळाल,
फक्त बाबा तुमच्यामुळेच...

Marathi Kavita : मराठी कविता