Author Topic: मला स्मरशील तू....  (Read 1002 times)

Offline सूर्य

  • Jr. Member
  • **
  • Posts: 59
  • Gender: Male
मला स्मरशील तू....
« on: December 05, 2009, 12:33:13 PM »
माझ्या वरी प्रेम किती करशील तू
पाहशील मला तेव्हा लाजशील तू

तुझ्या भोवती किती येर झ~या मारू
नाही म्हणून टोमने मारशील तू

आज दिवस प्रेमाचा उगवला तर
प्रेमा साठी किती झुरशील तू

प्रेम किती खोल माझे जानने आहे
बुडशील तेव्हाच प्रेमात तरशील तू

लाजुन पाहने हे तुझे नखरे आहेत
दुखात मी असता किती रडशील तू

आवाज येता माझा बहरतेस तेव्हा
हरवलोच मी कुठे मला शोधशील तू

मी आहे सूर्य बेखौफ किरणांचा राजा
किरणांची राणी माझी होशील तू

जमलेच नाही मला तुझे होने जरी
माझ्या सवे मला स्मरशील तू

सूर्य

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Parmita

  • Jr. Member
  • **
  • Posts: 249
Re: मला स्मरशील तू....
« Reply #1 on: December 09, 2009, 02:59:30 PM »
जमलेच नाही मला तुझे होने जरी
माझ्या सवे मला स्मरशील तू
chaan ahe...