Author Topic: माझी राणी  (Read 670 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,260
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
माझी राणी
« on: May 26, 2015, 11:18:30 PM »
माझी राणी

लाडे वाढली एकुलती
ठेवुनी मर्यादा मनी,
अभ्यासु चतुर हुशार 
कला निपुण सदगुणी !

जातेस सासरी आता
कुळमर्यादा ठेव ध्यानी,
सासु सासरे घर सारे
कुटुंब तुझेच घे मानुनी !

दाटला हुंदका कंठी
अन डोळ्यात पाणी,
बघ ग सखे चालली
सासरी माझी राणी !

© शिवाजी सांगळे


Marathi Kavita : मराठी कविता


Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 308
  • Gender: Male
Re: माझी राणी
« Reply #1 on: May 26, 2015, 11:57:21 PM »
छानच
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर